मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मजा किर्लोस्कर रोडची

  हा फोटो आहे सूर्योदयाचा. उद्देश एकच हा जो ब्लॉग मी लिहितोय तो प्रसाद सु प्रभू या नावाच्या व्यक्तीच्या स्वतंत्रपणे काही करून दाखविण्याच्या उदयाला सुरुवात झाली तेंव्हाचा.म्हणूनच सूर्योदयाचा फोटो घालून सुरुवात करतोय.  बेळगावच्या प्रकाश लॉजिंग मध्ये मॅनेजर म्हणून काम करण्याचा शुभारंभ झाला. किर्लोस्कर रोड वरील हा लॉज म्हणजे गोमंतकीय नागरिकांचे बेळगावातील हक्काचे घर. गोव्याचे लोक खरेदीसाठी दर आठवड्याला बेळगावला यायचे. आत्ताही येतात पण रस्ते सुसाट झाल्यापासून त्यांचे वास्तव्य कमी झाले. पूर्वी ते यायचे. बेळगावच्या मध्यवर्ती बाजारपेठेत मनसोक्त विहरायचे. खरेदी करायचे आणि वास्तव्याला एक तर हॉटेल अनुपम किंवा प्रकाश लॉजलाच जास्त पसंत करायचे. यामुळे सतत कोकणी बोलणाऱ्या आणि नेहमी चांगली मच्छि कुठे मिळता रे असे विचारणाऱ्या आवाजांची सवय करून घ्यावी लागली. इथला दिवस लवकर सुरू व्हायचा. सकाळी सहा वाजता उठावे लागायचे. रूम बॉईज सकाळी सकाळी बम्ब पेटवायचे. कस्टमरला लवकरात लवकर गरम पाणी मिळावे आणि कुणाचीही गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली जायची. लगेचच साफसफाई सुरू व्हायची. लॉजला आलेली माणसे रात्री उश...