हा फोटो आहे सूर्योदयाचा. उद्देश एकच हा जो ब्लॉग मी लिहितोय तो प्रसाद सु प्रभू या नावाच्या व्यक्तीच्या स्वतंत्रपणे काही करून दाखविण्याच्या उदयाला सुरुवात झाली तेंव्हाचा.म्हणूनच सूर्योदयाचा फोटो घालून सुरुवात करतोय. बेळगावच्या प्रकाश लॉजिंग मध्ये मॅनेजर म्हणून काम करण्याचा शुभारंभ झाला. किर्लोस्कर रोड वरील हा लॉज म्हणजे गोमंतकीय नागरिकांचे बेळगावातील हक्काचे घर. गोव्याचे लोक खरेदीसाठी दर आठवड्याला बेळगावला यायचे. आत्ताही येतात पण रस्ते सुसाट झाल्यापासून त्यांचे वास्तव्य कमी झाले. पूर्वी ते यायचे. बेळगावच्या मध्यवर्ती बाजारपेठेत मनसोक्त विहरायचे. खरेदी करायचे आणि वास्तव्याला एक तर हॉटेल अनुपम किंवा प्रकाश लॉजलाच जास्त पसंत करायचे. यामुळे सतत कोकणी बोलणाऱ्या आणि नेहमी चांगली मच्छि कुठे मिळता रे असे विचारणाऱ्या आवाजांची सवय करून घ्यावी लागली. इथला दिवस लवकर सुरू व्हायचा. सकाळी सहा वाजता उठावे लागायचे. रूम बॉईज सकाळी सकाळी बम्ब पेटवायचे. कस्टमरला लवकरात लवकर गरम पाणी मिळावे आणि कुणाचीही गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली जायची. लगेचच साफसफाई सुरू व्हायची. लॉजला आलेली माणसे रात्री उश...
मागच्या ब्लॉग मध्ये माझा प्रवास बेळगावच्या प्रसिद्ध प्रकाश लॉज च्या मॅनेजर पर्यंत झाला होता. मी लॉज मॅनेजर म्हणून कसं काम केलं आणि पुढे तरुण भारत पर्यंत कसा पोहोचलो हा सारा प्रवास पुढील ब्लॉग पासून सांगणार आहेच. मध्ये बराच वेळ गेला आणि ब्लॉग लिहायचं राहून गेलं. आणि मधला सर्व इतिहास पेंडिंग ठेऊन वर्तमानकालीन घडामोड सांगण्याची वेळ आली. माझ्या कारकिर्दीत सध्या आलेला एक टर्निंग पॉईंट आधी सांगून मग मागील प्रवासकडे वळण्याचा निर्णय मी घेतला आहे. आपण वेळ काढून वाचाल हीच अपेक्षा आहे. नमस्कार, मी प्रसाद सु. प्रभू. 2004 पासून तरुण भारत या दैनिकात कार्यरत होतो. विद्यार्थी वार्ताहर, वार्ताहर ते विविध भूमिका निभावत निभावत सध्या सोशल मीडिया टीम प्रमुख आणि यु ट्यूब चॅनेल चा डिजिटल एडिटर. होय होतो, आता नाही. मी माझ्या पदाचा आणि सेवेचा राजीनामा दिला आणि त्याला आज एक महिना पूर्ण झाला. नोटीस पिरियड संपला आणि आता मी मुक्तपणे पत्रकारिता तसेच इतर अनेक भूमिकांमधून तुमच्या सगळ्यांच्याच भेटीला येत राहणार आहे. राजीनामा दिला तर का दिला? खरंच सोडलं की काढलं? असे अनेक प्रश्न विचारणारे फोन आले म्हणून सांगतोय, माझी स...