मुख्य सामग्रीवर वगळा

ते दिवस.....

पत्रकारितेत दाखल झालो तो काळ थोडा बिकट होता. 2004 सालची गोष्ट आहे. आजपासून बरोबर सतरा वर्षांपूर्वी. त्यावेळी मी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन शाखेतून डिप्लोमा करायचो. आम्ही तसे मूळचे बेळगावच्या टिळकवाडीचेच पण आमचे कुटुंब जवळच्याच चंदगड तालुक्यातील तुर्केवाडीला शिफ्ट झाले आणि आम्ही तुर्केवाडीकर झालो. (तो सगळा इतिहास नंतर कधी तरी लेखनात नक्की येईल.)

माझे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण तुर्केवाडीलाच झाले. त्यानंतर डिप्लोमासाठी मी बेळगावला येऊ लागलो. आमच्या जनता विद्यालयात दहावीला वर्गात पहिला क्रमांक घेऊन उत्तीर्ण झालेला मी त्यावेळचा गाव लेव्हलला हुशार विद्यार्थी. हुशारी नेमकी काय असते ते बेळगावच्या आर एन शेट्टी पॉलिटेक्निकला आल्यावर चांगलीच कळली. इंग्रजी बोलता येत नव्हते. कन्नडचा तर गंधच नव्हता आणि डिप्लोमाचा अभ्यासक्रम डोक्यावरून जात होता. कॅपॅसीटर, डायोड, सेमीकंडक्टर सारख्या वस्तू आणि बाकीचे शब्द,प्रॅक्टिकल्स आणि थेअरी सगळेच बाऊन्सर मारत होते. मी हुशार होतो मराठी लेखनात, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धात पण मार्गच बदलला होता. एरव्ही रट्टा मारून वीस वीस मिनिटे भाषणे झोडून स्पर्धा गाजवणारा मी, इथे काहीच पाठ होईना मग मी पूर्वी कधीच परीक्षेत दांडी न उडालेला हुशार विद्यार्थी नापास होऊ लागलो होतो. अखेर ठरलं आवडत्या क्षेत्रातच जायचं पण काय आवडतं आणि काय शिकलं पाहिजे याचा शोध लागत नव्हता, दिशा कळत नव्हती आणि मार्ग धूसर होता.

इतक्यात माझे मामा एकेदिवशी बेळगावला आले असता त्यांच्या हाती त्यादिवशीचा तरुण भारत लागला. आणि त्यात जाहिरात होती विद्यार्थी वार्ताहर हवे आहेत. अनपेक्षितरीत्या कसे मार्ग मिळत राहतात ते बघा. खरंतर माझे मामा आपल्या कुटुंबासोबत जीवाचं बेळगाव करायला आले होते. (माझे मामा पण मूळचे बेळगावचेच आणि ते तुर्केवाडीला स्थलांतरित झाले होते. त्यांच्याकडेच आम्हालाही जावे लागले होते. हा ही इतिहास फार मोठा आहे तो नंतर कधीतरी पाहूच) पहिली गोष्ट असायची ती बेळगावला आल्यावर शेट्टी स्नॅक्स किंवा जवळच्याच कुठल्यातरी हॉटेलात जाऊन नाष्टा करणे आणि कुठल्या चित्रपटगृहात कुठला चित्रपट लागलाय हे पाहण्यासाठी तरुण भारत वाचणे. तर यापद्धतीने ती जाहिरात वाचल्यावर त्यांनी मला तिथूनच फोन केला. तो काळ मोबाईलचा नव्हता त्यामुळे पुढची गम्मत नक्कीच सांगण्यासारखी आहे,वाचा पुढील भागात...........

--------------------------------------------------------------------------

English Version

The time I entered journalism was a bit difficult.  The story is from 2004.  seventeen years ago today.  At the time, I was pursuing a diploma in electronics and communication.  We were originally from Tilakwadi in Belgaum but our family moved to Turkewadi in nearby Chandgad taluka and we became Turkewadikars.  (That whole history will definitely be written sometime later.)


   My primary and secondary education was held at Turkewadi.  After that I started coming to Belgaum for diploma.  I was a smart student at the village level at that time.  Was stood first in 10th in our Janata Vidyalaya.  When I came to Shetty Polytechnic, It started to understand what actual smartness is.  I could not speak English.  There was no smell of Kannada and the diploma course was going beyond my head.  Capacitors, diodes, semiconductors and the rest were hitting bouncers. practicals and theory classes were big tention.  I was smart in Marathi writing, oratory and essay competition.  I was winning a twenty minute speech contest in school times with the formula of byhading. but there was no lesson being learned here, I was a smart student who had never failed an exam before.  But here many times I was clean bold.  Eventually I decided to move to my favorite area but didn’t know what I liked and what I wanted to learn.  The direction was unknown and the road was unclear.


   That's when my mama came to Belgaum one day, he got the Tarun bharat newspaper of that day.  Accidentally he seen  an advertisement Tarun bharat is hiring Student reporter.  See how unexpected ways are getting.  In fact, my uncle had come to Belgaum with his family.  (My uncle was originally from Belgaum and he had migrated to Turkewadi. We had to go to him too. This is a long history. We will see about that sometime later.) When he comes to belgaum He used to do that to see which movie was in which cinema, but after reading the advertisement like this, he called me from there.  He phoned me on one landline,because there was neither mobile with me nor him. so the next joke is definitely worth telling, read the next part ...........

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शोधायला पण लागते अक्कल

 मी काही प्रसिद्ध लेखक नाही. मात्र तरुण भारत च्या कृपेने नक्कीच प्रसिद्ध बातमीदार आहे. एक शैली विकसित करण्यासाठी अनेक वर्षे जावी लागली. पण जी शैली लेखनाच्या बाबतीत आली त्या शैलीचे अर्थात माझ्या लेखनाचे कौतुकही झाले. कामाच्या बाबतीत अनेक ज्येष्ठ व्यक्तींकडून हा अनुभव आला आहेच. आता ब्लॉगचे लिखाण सुरू झाल्यावर तर याचा अनुभव अधिक प्रमाणात येतोय. माझ्या सख्या सहकाऱ्यांनी कौतुक केले, एक वेबसिरीजचा निर्माता फोन करून स्तुती करून राहिला आणि इतर सर्वांनी तर अरे बाबा लवकर लवकर लिही असे सांगून ऊर्जा वाढविली.  केवळ दोन तीन ब्लॉग लिखाणातच मिळालेली दाद ऐकून नेहमीप्रमाणे माझी छाती रुंदावली आहे. मी माझ्या एक खास वाचकाशी काल बोलत होतो. त्या वाचकाने माझ्या मागच्या ब्लॉग वरून म्हटले की प्रसाद अरे तू अजून तुर्केवाडी फाट्यापर्यंत पोहोचला नाहीस. मी म्हटलं जिथे मी सतरा वर्षे नोकरी केली ते तरुण भारत चं कार्यालय मला माहित नव्हतं, मी चालत होतो आणि विचारात होतो.वाचकाने सांगितलं आता पुढचं लिही आणि तो वाचक खास असल्याने म्हणालो अशी उत्सुकता ताणवायला मला आवडतं. मग आम्ही आमच्या व्हाट्सअप्प चॅट वर इमोजी वापरून...

धाकधूक वाढत गेली

 बातम्या वाचणे हा प्रकार माहीत होता पण सलग असे रोज पेपर वाचणे लहानपणी कधी जमले नाही. घरी पेपर घेणं परवडत नव्हतं आणि रविवारी घेतलेला तरुण भारत मुख्य पेपर वाचण्यापेक्षा अक्षरयात्रा पुरवणी वाचण्याबद्दल फार भर होता. सुंदर सुंदर कव्हर स्टोरी आणि आणि ललित लेख वाचायला फार आवडायचे. त्यावेळी अक्षरयात्रेत काही कादंबरी क्र म श स्वरूपात यायच्या,त्या वाचायला मजा यायची. अभ्यासाच्या गोंधळात विशेष वाचन व्हायचं नाही आणि जे काही वेगळं वाचन व्हायचं ते या पुरवणीमुळे त्यामुळे प्रतीक्षा लागून राहिलेली असायची. तसाच बुधवारचा खजाना आणि शुक्रवारी फिल्मी दुनियेवर आधारित पुरवणी हाती पडली की मनसोक्त वाचायची सवय जडली होती. यामुळे बातमी वाचण्याकडचा कल कमी होता. आठवी नववीत गेल्यावर आमच्या जनता विद्यालय हायस्कुलचे मुख्याध्यापक एस एम पाटील सरांनी वर्तमानपत्रात येणारे अग्रलेख वाचण्याचा सल्ला दिला होता. आसपास काय घडतं यावर केलेलं विस्तृत आणि अभ्यासपूर्ण लेखन असतं ते, त्यामुळे वाचा अशी सूचना त्यांनी एकदा वर्गात केली होती. त्यामुळे कधी कधी आणि शक्यतो कमीच अग्रलेख वाचले गेले होते. हे सांगायचा मुद्दा हा की मी बसमध्ये बसू...

अरे परसाद फोन आया है..............

 मागच्या भागात मी म्हणालो, हो तो काळ मोबाईल फोनचा नक्कीच नव्हता. बीएसएनएल चे तरंग नावाचे ओबडधोबड हँडसेट आले होते. त्यावरून कॉल करणाऱ्या आणि घेणाऱ्या अशा दोघांनाही खर्च व्हायचा. म्हणजे पैसे कट व्हायचे. ग्रामीण भागात बीएसएनएल चेच लँडलाईन किंवा हे तरंग हा आधार होता. शहरी भागात स्पाईस कंपनीचे हँडसेट आले होते. रिलायन्स चा दुनिया मुठ्ठीमे म्हणणारा जमाना या क्षेत्रात अजून यायचा होता. आमच्या मामांकडे मोबाईल नव्हता आणि आमच्या घरी तर फोन असण्याचा संबंध अजिबात नव्हता. गल्लीच्या कोपऱ्यावर असलेल्या अबुल भैय्या( म्हणजे तुर्केवाडीचे अबुल शेख. ते सध्या मोठे व्यापारी आहेत)यांच्या दुकानातील फोन हाच आमचा आधार. अबुल भैय्या कायम बाहेर आणि भाभी कायम दुकानात. त्यांच्या दुकानातील साहित्य उधारी घेऊन आम्ही जमेल तेंव्हा पैसे द्यायचो. कधी कुणाला फोन करायचा झाला तरी तीही उधारी सामानाच्या उधारी यादीत समाविष्ट व्हायची. रात्री अपरात्री कधीही फोन आला तरी हाक मारायला हे भैय्या भाभी कधीच त्रास वाटून घ्यायचे नाहीत. त्यादिवशीही तसेच झाले. 2004 चा जानेवारी महिना होता आणि तारीख होती 15. अचानक भाभीचा आवाज आला. अरे परसाद ...