बातम्या वाचणे हा प्रकार माहीत होता पण सलग असे रोज पेपर वाचणे लहानपणी कधी जमले नाही. घरी पेपर घेणं परवडत नव्हतं आणि रविवारी घेतलेला तरुण भारत मुख्य पेपर वाचण्यापेक्षा अक्षरयात्रा पुरवणी वाचण्याबद्दल फार भर होता. सुंदर सुंदर कव्हर स्टोरी आणि आणि ललित लेख वाचायला फार आवडायचे. त्यावेळी अक्षरयात्रेत काही कादंबरी क्र म श स्वरूपात यायच्या,त्या वाचायला मजा यायची. अभ्यासाच्या गोंधळात विशेष वाचन व्हायचं नाही आणि जे काही वेगळं वाचन व्हायचं ते या पुरवणीमुळे त्यामुळे प्रतीक्षा लागून राहिलेली असायची. तसाच बुधवारचा खजाना आणि शुक्रवारी फिल्मी दुनियेवर आधारित पुरवणी हाती पडली की मनसोक्त वाचायची सवय जडली होती. यामुळे बातमी वाचण्याकडचा कल कमी होता. आठवी नववीत गेल्यावर आमच्या जनता विद्यालय हायस्कुलचे मुख्याध्यापक एस एम पाटील सरांनी वर्तमानपत्रात येणारे अग्रलेख वाचण्याचा सल्ला दिला होता. आसपास काय घडतं यावर केलेलं विस्तृत आणि अभ्यासपूर्ण लेखन असतं ते, त्यामुळे वाचा अशी सूचना त्यांनी एकदा वर्गात केली होती. त्यामुळे कधी कधी आणि शक्यतो कमीच अग्रलेख वाचले गेले होते.
हे सांगायचा मुद्दा हा की मी बसमध्ये बसून विद्यार्थी वार्ताहर होण्यासाठी निघालो होतो. अर्ज द्यायचा होता. आणि अर्ज दिल्यावर जर तात्काळ मुलाखत वगैरे घेतली गेली तर काय सांगायचे हा प्रश्न सतावू लागला होता. कारण वाचन आणि तेही बातम्यांचे वाचन अजिबात नव्हते. घटना घडामोडींचा अभ्यास नव्हता. नेमकं काय विचारलं जाईल याची कल्पना नव्हती आणि अंदाजही नव्हता. पण काय होईल ते होईल, जाऊन तर येऊ हा आत्मविश्वास नक्कीच होता. तसं पाहिलं तर मी अगदीच काय मूर्ख नव्हतो पण धाकधूक वाढत होती.
या सगळ्या विचारात मी बसमध्ये खिडकी धरून बाहेर बघत बसलो होतो. आणि दरवेळेस उशीर करत जाणारी बस जरा लवकरच पोहोचू लागली होती. दुपारची वेळ होती आणि वाटेत लागणाऱ्या सर्वच गावांच्या फाट्यावर म्हणावे तसे प्रवासी नव्हते म्हणून असेल आमच्या एस टी डेपोचे ड्रायव्हर बस तुफान हंबडत होते. एव्हाना बेळगावचा तो स्टॉप आला. बसमधून उतरून मी चालू लागलो. पहिला यंदे खुट आणि त्यानंतर काहीकाळ चालल्यावर समादेवीचे मंदिर आले. खरंतर ती सीमादेवी म्हणजेच बेळगावच्या सीमेवर असलेली देवी. वैश्यवाणी समाजाची देवता. पुढे अपभ्रंश होऊन ते नाव समादेवी झाल्याचे मी वाचलेले आहे. त्या मंदिरात जाऊन डोके टेकले आणि तिथेच आराम बसलेल्या एक व्यक्तीला विचारले तरुण भारत चे कार्यालय येथून जवळ आहे का? बेळगावचे लोक कधीच पत्ता सांगायला आणि रस्ता दाखवायला का कू करीत नाहीत. त्यांनी म्हटलं अहो इथेच, जवळच, ही नार्वेकर गल्ली सुरू झाली. सरळ चालत जा म्हणजे गल्लीच्या टोकावर सर्वात शेवटी जी इमारत लागेल ती तरुण भारतचीच. म्हणजे आमच्या हैदर मामुनी सांगितलेलं बरोबर आहे तर, मी मनातच बोललो. तेवढ्यात पुढून आवाज आला, काय काम काढला तरुण भारतात? बातमी बितमी द्यायची आहे काय? मी म्हटलं नाही हो,मला तिथे नोकरीसाठी अर्ज द्यायला जायचं आहे. ते खुश झाले आणि देवीच्या पुजाऱ्याला हाक मारली. इंटरव्ह्यू आहे जरा एक फुल द्या याला. पुजाऱ्यानेही लगेच काहीशी प्रार्थना देवी समोर उभा राहून म्हटली आणि माझ्या हातात वरूनच एक फुल टाकले. येऊन नमस्कार करत जा. पुजारी म्हणाले. मी फुल खिशात टाकले आणि माझा पुढचा प्रवास सुरु झाला.
वाट चुकीची नाही आणि आपण बरोबर आलोय यात समाधान होते पण जसजसे तरुण भारत चे कार्यालय जवळ येईल तशी धाकधूक जास्तच वाढली होती. तो बंदुकधाऱ्या शिपायांचा विषय एक डोक्यातून जात नव्हता. इतक्यात मी पोचलो होतो. आत गेलो, सर्व वातावरण शांत होते. भलेमोठे गेट ओलांडून गेल्यावर एकाने विचारले कोण पाहिजे? मी त्यांना मी कशाला आलोय याची माहिती दिली. त्यांनी बोट करून दाखवत पुढे जा आणि सिक्युरिटीला भेटा असा सल्ला दिला. सिक्युरिटीकडे गेल्यावर पुन्हा काय काम ते परत सांगावे लागले. त्यांनी वर पहिल्या मजल्यावर टेलिफोन ऑपरेटर आहेत त्यांना भेटा असा सल्ला दिला. तसाच पायऱ्या चढत वर गेलो. तिथे एक मॅडम बसल्या होत्या. त्यांना सांगितले मी अर्ज द्यायला आलोय.
मॅडमनी समोर बसा अशी खूण करीत फोनवरील संभाषण आवरले. एक दोन फोन इकडून तिकडे ट्रान्सफर केले. बोला तरुण भारत, हो आहेत देते, ते नाहीत नंतर बोला, उद्या करा, हो देते असा त्यांचा चाललेला नित्य नियमांचा संवाद ऐकत मी हातात माझ्या अर्जाचे पाकीट घेऊन बसून राहिलो. शेवटी त्यांनी काहीकाळ फोन बंद झाल्यावर मला हाक मारली. अर्ज द्या, मी दिला. त्यांनी तो उघडून बघितला. अक्षर छान आहे की, तुम्हीच लिहिलंय ना सगळं? त्यांनी विचारलं, मी होय मीच लिहिलंय असं सांगितलं. ठीक आहे देते मी अर्ज, आणि तुम्हाला फोन येईल, असं त्या म्हणाल्या. फक्त पाकिटावर विद्यार्थी वार्ताहर पदासाठी अर्ज असं लिहा आणि प्रति, मॅनेजर एच आर, तरुण भारत बेळगाव याचा उल्लेख करा, अशी सूचना त्यांनी केली. मी चटकन ती पूर्ण केली. तुम्ही जाऊ शकता आणि उगाच फोन करत बसू नका, आम्ही कळवल्यावरच या. असे त्या शेवटी म्हणाल्या.
इतके फोन सातत्याने घेणं म्हणजे अवघड काम, त्यात माझे आणि एकदोन फोन येऊ नयेत याची व्यवस्था त्यांनी केली होती. त्यानंतर परत येऊन स्टॉप पर्यंत आणि तिथून परत तुर्केवाडी असा प्रवास झाला. आता एकच लक्ष्य लागलं होतं. तरुण भारत एके तरुण भारत. आमच्या भाभीन्ना सांगून ठेवलं होतंच. कधी बोलावणं येईल याची प्रतीक्षा लागून राहिली होती.
English version
I knew why to read the news, but I never read a daily paper in childhood. It was unaffordable to take the paper at home and the Tarun Bharat when we took it on Sunday was more focused on reading the Aksharayatra supplement than on reading the main paper. Loved reading the beautiful cover story and and fine articles. At that time, some of the novels in Aksharayatra came in chronological order, fun to read. There was no time for special reading in middle of the study and whatever was to be a different reading would have been a long wait because of this supplement. Also, when I got the supplement on Wednesday's khajana and Friday's film world, I got into the habit of reading with pleasure. This reduced the tendency to read the news. At the age of eight or nine standard, then headmaster of our Janata Vidyalaya High School, S M Patil sir, had advised us to read the headlines in the newspapers. There is a detailed and scholarly writing done on what is happening around, so he once suggested in the class to read. So sometimes and possibly less headlines were read.
The point to make is that I got on the bus to apply for the job of student reporter. Wanted to apply. And the question of what to say if an immediate interview etc. was conducted after submitting the application was starting to bother me. Because reading and even reading the news was not my hobby. Incidents and details of happenings were not in my mind. I had no idea what they will ask and no guess. But I was confident that whatever happens, it will happen. Seeing that, I was not a fool at all, but the pressure was growing.
With all these thoughts in mind, I was sitting in the bus holding the window and looking out. And the bus, which was always late, was arriving a little early. It was noon and there were not much passengers on all the villages along the way, so the driver of our ST depot bus was storming. Bus came to that stop of Belgaum. I got off the bus and started walking. The first Yande Khut and after some time walking came the temple of Samadevi. In fact, she is Seemadevi, the goddess on the border of Belgaum. The deity of the Vaishya vani community. I have read that the name was later changed to Samadevi. I went inside the temple and bowed his head and asked a person sitting there, "Is Tarun Bharat's office near here?" the people of Belgaum never hesitate to give an address and show the way. He said, "Hey, this is where the Narvekar street started." Walk straight so that the last building at the end of the street is that of Tarun bharat. I mean, if what our Haider Mamu said is true, I said it in my mind. At that moment, a voice came forward, why going to Tarun bharat? Want to give any news? I say no no, I wanted to go there to apply for a job. He rejoiced and called the priest of the goddess. There is an interview. Give him a flower. The priest also immediately stood in front of the Goddess and said a prayer and put a flower in my hand. Came and greet me. Said the priest. I put the flower in my pocket and my next journey began.
as I approach the office of Tarun Bharat, l overwhelmed. The subject of that gunman was not going through one head. By then I had arrived. Went inside, all the atmosphere was quiet. After crossing the big gate, one asked who should it be? I told them why I was there. He pointed to the boat and advised to go ahead and meet the security. When I went to the security, I had to tell him what to do again. He advised the telephone operators upstairs to meet . I also went up the stairs. There was a madam sitting there. I told her I come to apply.
The conversation on the phone ended, signaling Madame to sit in front. One or two phones were transferred from one place to another. Say Tarun bharat, yes, yes, yes, yes, yes, yes, yes, yes, yes, yes, yes, yes, yes, yes, yes, yes, yes, yes, yes, yes, yes, yes, yes, yes, yes, yes. She finally called me after the phone was off for a while. Apply, I gave. She opened it and looked. The lettering is nice, isn't it? SHe asked, "Yes, I wrote it." "Okay, I'll give the application to concern department, and you'll get a call," she said. Just write the application for the post of student correspondent on the envelope and mention the copy, Manager HR, Tarun Bharat Belgaum, She suggested. I quickly completed it. You can go and don't just call, just come when we call you. That's what she finally said.
It was a difficult task to get so many phone calls consistently, she had arranged for me and avoided couple of phones not to come from me. Then l came back to the stop and from there back to Turkewadi. Now there was only one goal. Tarun Bharat Tarun Bharat. I had also told bhabhi to be alert and inform. I was waiting for the call to come.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा