मुख्य सामग्रीवर वगळा

का लिहितोय?

 नमस्कार मंडळी,

मी प्रसाद सु प्रभू. आपण मला ओळखताच, पण तरीही ज्यांना माझा परिचय नाही त्यांना तो करून द्यायलाच हवा. मी एक पत्रकार. सध्या सोशल मीडियावर काम करतोय. खरंतर पत्रकार होईन असं कधी वाटलं नव्हतं आणि ठरवलंही नव्हतं, पण काही प्रसंग घडले आणि मी या क्षेत्रात आलो. सुरुवातीला प्रिंट मीडियात काम करताना कधी वाटलंही नव्हतं की माझी अशी वेगळी ओळख निर्माण होईल म्हणून.

पण शेवटी झालंच. नाव चमकू लागलं. अनेक घटना आणि प्रसंगात फक्त बातमी पुरते मर्यादित न राहता, बातमीच्या आत शिरण्याचा प्रयत्न करायचा असतो हे ही अनुभवातून कळत गेलं आणि मी नावाजला गेलो. कौतुक झालं, पुरस्कार मिळाले आणि कामाच्या अनेक संधीही आल्या. अनेक वर्षे मुद्रित माध्यमातून काम करणारा मी दृकश्राव्य प्रकारच्या क्षेत्रात सोशल मीडियावर चमकू लागलो. पूर्वी पेपरला बातमीवर बायलाईन यावी अर्थात आपलं नाव यावं अशी एक इच्छा असायची. कधीतरी उपसंपादकांनी नाव काढलं की तडफड व्हायची, पण आत्ता तर मी थेट दर्शकांसमोर जाऊन त्यांच्याशी कधी एडिटेड व्हिडीओ मधून तर कधी थेट live हितगुज करू लागलो. आमचा काळ आधुनिक पत्रकारितेवर स्वार होणारा यामुळे माहिती मिळवण्यासाठी अधिक परिश्रम घेण्याची गरज कधी उरली नाही पण माहिती जितक्या जलद मिळते तितक्या जलद ती खरी की खोटी हे ओळखण्याची कसोटी मात्र आमच्या कामात आली. नव्या माध्यमांवर स्वार झाल्यास टिकाव लागणार हे सत्य ओळखून स्वतःमध्ये अनेक बदल करून घेतले. या साऱ्या आव्हानात्मक परिस्थितीची जाणीव मला ओळखणाऱ्या न ओळखणाऱ्या व्यक्तींना व्हावी आणि नवीन माणसं जोडली जावीत हाच या ब्लॉग चा उद्देश आहे.

का लिहितोय? असा प्रश्न जेंव्हा मी स्वतःला विचारला तेंव्हा सुरुवातीला काही प्रमाणात जे सुचलं त्यातून आणखी उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सुरू ठेवणार आहे. मी एक साधा माणूस आहे आणि सध्या सर्व ठिकाणी माझा हॅशटॅग ट्रेंडींग आहे. म्हणून माझ्यातला प्रवास इथे उमटत राहणार आहे.

__________________________________________________

English Version

Hello,


 I am Prasad S Prabhu.  You know me, but still those who don't know me have to do it.  I am a journalist.  Currently working on social media.  In fact, I never thought or decided to become a journalist, but some events happened and I came to this field.  Initially, working in print media, I never thought that I would have such a different identity.


 But in the end it happened.  The boat started to shine.  In many cases and events, I learned from experience that I wanted to try to get into the news, not just the news, and I became famous.  Appreciated, received awards and many job opportunities.  Having worked through the print media for many years, I began to shine on social media in the field of audio-visual type.  In the past, there was a desire for the paper to have a byline on the news, that is, for your name to appear.  Sometimes the sub-editors not mentioned the name, but now I go directly to the audience and sometimes  with  the edited video and sometimes live.  With the advent of modern journalism in our time, there has never been a need to work harder to get information, but the faster we get the information, the faster we get to know whether it is true or false.  Recognizing the fact that new mediums would be sustainable, he made many changes in himself.  The purpose of this blog is to make people who don't know me aware of all these challenging situations and to add new people.


 Why are you writing ? When I ask myself this question, I will continue to try to find more answers from what I initially suggested.  I’m a simple guy and my hashtag is trending everywhere right now.  So my journey will continue here.

टिप्पण्या

  1. Excellent blog... Keep it up...I am sure, your dedicated, committed & meticulous work will have a great future in your endeavor

    उत्तर द्याहटवा
  2. पुढिल कार्यास शुभेच्छा. आगामी काळात आपन सिमाप्रश्न ,सर्व सामान्यचे प्रश्न, अन्यायाविरुद्ध आपली पत्रकारितेला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा साहेब. हे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शोधायला पण लागते अक्कल

 मी काही प्रसिद्ध लेखक नाही. मात्र तरुण भारत च्या कृपेने नक्कीच प्रसिद्ध बातमीदार आहे. एक शैली विकसित करण्यासाठी अनेक वर्षे जावी लागली. पण जी शैली लेखनाच्या बाबतीत आली त्या शैलीचे अर्थात माझ्या लेखनाचे कौतुकही झाले. कामाच्या बाबतीत अनेक ज्येष्ठ व्यक्तींकडून हा अनुभव आला आहेच. आता ब्लॉगचे लिखाण सुरू झाल्यावर तर याचा अनुभव अधिक प्रमाणात येतोय. माझ्या सख्या सहकाऱ्यांनी कौतुक केले, एक वेबसिरीजचा निर्माता फोन करून स्तुती करून राहिला आणि इतर सर्वांनी तर अरे बाबा लवकर लवकर लिही असे सांगून ऊर्जा वाढविली.  केवळ दोन तीन ब्लॉग लिखाणातच मिळालेली दाद ऐकून नेहमीप्रमाणे माझी छाती रुंदावली आहे. मी माझ्या एक खास वाचकाशी काल बोलत होतो. त्या वाचकाने माझ्या मागच्या ब्लॉग वरून म्हटले की प्रसाद अरे तू अजून तुर्केवाडी फाट्यापर्यंत पोहोचला नाहीस. मी म्हटलं जिथे मी सतरा वर्षे नोकरी केली ते तरुण भारत चं कार्यालय मला माहित नव्हतं, मी चालत होतो आणि विचारात होतो.वाचकाने सांगितलं आता पुढचं लिही आणि तो वाचक खास असल्याने म्हणालो अशी उत्सुकता ताणवायला मला आवडतं. मग आम्ही आमच्या व्हाट्सअप्प चॅट वर इमोजी वापरून...

धाकधूक वाढत गेली

 बातम्या वाचणे हा प्रकार माहीत होता पण सलग असे रोज पेपर वाचणे लहानपणी कधी जमले नाही. घरी पेपर घेणं परवडत नव्हतं आणि रविवारी घेतलेला तरुण भारत मुख्य पेपर वाचण्यापेक्षा अक्षरयात्रा पुरवणी वाचण्याबद्दल फार भर होता. सुंदर सुंदर कव्हर स्टोरी आणि आणि ललित लेख वाचायला फार आवडायचे. त्यावेळी अक्षरयात्रेत काही कादंबरी क्र म श स्वरूपात यायच्या,त्या वाचायला मजा यायची. अभ्यासाच्या गोंधळात विशेष वाचन व्हायचं नाही आणि जे काही वेगळं वाचन व्हायचं ते या पुरवणीमुळे त्यामुळे प्रतीक्षा लागून राहिलेली असायची. तसाच बुधवारचा खजाना आणि शुक्रवारी फिल्मी दुनियेवर आधारित पुरवणी हाती पडली की मनसोक्त वाचायची सवय जडली होती. यामुळे बातमी वाचण्याकडचा कल कमी होता. आठवी नववीत गेल्यावर आमच्या जनता विद्यालय हायस्कुलचे मुख्याध्यापक एस एम पाटील सरांनी वर्तमानपत्रात येणारे अग्रलेख वाचण्याचा सल्ला दिला होता. आसपास काय घडतं यावर केलेलं विस्तृत आणि अभ्यासपूर्ण लेखन असतं ते, त्यामुळे वाचा अशी सूचना त्यांनी एकदा वर्गात केली होती. त्यामुळे कधी कधी आणि शक्यतो कमीच अग्रलेख वाचले गेले होते. हे सांगायचा मुद्दा हा की मी बसमध्ये बसू...

अरे परसाद फोन आया है..............

 मागच्या भागात मी म्हणालो, हो तो काळ मोबाईल फोनचा नक्कीच नव्हता. बीएसएनएल चे तरंग नावाचे ओबडधोबड हँडसेट आले होते. त्यावरून कॉल करणाऱ्या आणि घेणाऱ्या अशा दोघांनाही खर्च व्हायचा. म्हणजे पैसे कट व्हायचे. ग्रामीण भागात बीएसएनएल चेच लँडलाईन किंवा हे तरंग हा आधार होता. शहरी भागात स्पाईस कंपनीचे हँडसेट आले होते. रिलायन्स चा दुनिया मुठ्ठीमे म्हणणारा जमाना या क्षेत्रात अजून यायचा होता. आमच्या मामांकडे मोबाईल नव्हता आणि आमच्या घरी तर फोन असण्याचा संबंध अजिबात नव्हता. गल्लीच्या कोपऱ्यावर असलेल्या अबुल भैय्या( म्हणजे तुर्केवाडीचे अबुल शेख. ते सध्या मोठे व्यापारी आहेत)यांच्या दुकानातील फोन हाच आमचा आधार. अबुल भैय्या कायम बाहेर आणि भाभी कायम दुकानात. त्यांच्या दुकानातील साहित्य उधारी घेऊन आम्ही जमेल तेंव्हा पैसे द्यायचो. कधी कुणाला फोन करायचा झाला तरी तीही उधारी सामानाच्या उधारी यादीत समाविष्ट व्हायची. रात्री अपरात्री कधीही फोन आला तरी हाक मारायला हे भैय्या भाभी कधीच त्रास वाटून घ्यायचे नाहीत. त्यादिवशीही तसेच झाले. 2004 चा जानेवारी महिना होता आणि तारीख होती 15. अचानक भाभीचा आवाज आला. अरे परसाद ...