मुख्य सामग्रीवर वगळा

शोधायला पण लागते अक्कल

 मी काही प्रसिद्ध लेखक नाही. मात्र तरुण भारत च्या कृपेने नक्कीच प्रसिद्ध बातमीदार आहे. एक शैली विकसित करण्यासाठी अनेक वर्षे जावी लागली. पण जी शैली लेखनाच्या बाबतीत आली त्या शैलीचे अर्थात माझ्या लेखनाचे कौतुकही झाले. कामाच्या बाबतीत अनेक ज्येष्ठ व्यक्तींकडून हा अनुभव आला आहेच. आता ब्लॉगचे लिखाण सुरू झाल्यावर तर याचा अनुभव अधिक प्रमाणात येतोय. माझ्या सख्या सहकाऱ्यांनी कौतुक केले, एक वेबसिरीजचा निर्माता फोन करून स्तुती करून राहिला आणि इतर सर्वांनी तर अरे बाबा लवकर लवकर लिही असे सांगून ऊर्जा वाढविली. 

केवळ दोन तीन ब्लॉग लिखाणातच मिळालेली दाद ऐकून नेहमीप्रमाणे माझी छाती रुंदावली आहे. मी माझ्या एक खास वाचकाशी काल बोलत होतो. त्या वाचकाने माझ्या मागच्या ब्लॉग वरून म्हटले की प्रसाद अरे तू अजून तुर्केवाडी फाट्यापर्यंत पोहोचला नाहीस. मी म्हटलं जिथे मी सतरा वर्षे नोकरी केली ते तरुण भारत चं कार्यालय मला माहित नव्हतं, मी चालत होतो आणि विचारात होतो.वाचकाने सांगितलं आता पुढचं लिही आणि तो वाचक खास असल्याने म्हणालो अशी उत्सुकता ताणवायला मला आवडतं. मग आम्ही आमच्या व्हाट्सअप्प चॅट वर इमोजी वापरून भरपूर हसलो. दाद मिळायला लागली की कळतं लोक तुमच्याबद्दल जाणून घ्यायला उत्सुक आहेत. म्हणून हा पुढचा भाग अर्थात ब्लॉग लिहायला घेतलाय.

तर झालं असं विद्यार्थी वार्ताहर या पदासाठी मी तरुण भारत मध्ये अर्ज दाखल करायला निघालो होतो, सगळी तयारी झाली होती आणि आमच्या गावापासून एक किलोमीटरवर असलेल्या फाट्याकडे माझा पायी प्रवास सुरु झाला होता. आणि लक्षात आले की आता बेळगावच्या सेंट झेवीयर्स जवळ बस थांबल्यावर मला पहिल्यांदा कुणालातरी तरुण भारत चं कार्यालय कुठे आहे ते विचारावं लागेल. त्या विचाराने मनातला गोंधळ थोडा कमी झाला आणि मी फाट्याकडे जाण्यासाठी झपाट्याने पावले टाकण्यास सुरुवात केली. ऊन वाढत होतं, सगळी तयारी करण्यासाठी बराच उशीर झाला होता आणि दुपारी दीड च्या त्या तप्त वातावरणात पॉंड्स ची पावडर लावलेला माझा चेहरा घामाने धुऊन निघत होता. चेहऱ्यावर कोवळी मिशी फुटलेला मी सुंदर दिसण्याचा प्रयत्न करायचो. वय होतं अवघं 18 आणि दोन तीन दिवसात 18 पूर्ण होऊन 19 सुरूही होणार होतं. त्याकाळी अतिशय बालिश अशा वयात वरचेवर डोक्यावरचे केस फिरवायचे आणि आपण कोणत्या हिरोसारखा दिसतो हे आरशात न्याहाळत राहायचे हाच एक छंद लागला होता. सगळे खान आमच्या बालवयातले हिरो होते. तर तारुण्याच्या त्या नव्या वळणावर दाढीचे खुंट आणि लांब कल्ले वाला हृतिक आला होता, त्यामुळे चालता बोलताना आपण तसे दिसतोय असा मनात समज करून घेऊन आनंदी होत राहायचा पोरकटपणा चालूच होता. मनात त्यावेळी आनंद देणारे हे असले विचार आले की ऊन,पाऊस किंवा रस्त्यावरून चालणारी पावले आणि कापायचे अंतर या सगळ्याचा विसर पडायचा.

त्यामुळेच मी लवकर आमच्या फाट्यावर पोचलो. दुपारचे पावणे दोन वाजले होते. फाट्यावर आल्यावर आम्हाला हैदर मामुचा आधार होता. अनेकवर्षांपासून फाट्यावर चहाचा आणि चवदार भजीचा स्टॉल लावणारे हैदर शेख म्हणजे त्याकाळचे मार्गदर्शक होते. गोव्यापासून बेळगाव पर्यंतच्या रस्त्याचे विकिपीडिया आणि बसचे वेळापत्रक तर तोंडपाठच जणू, त्यांची भेट घेतली. कशाला ते सांगितले नाही कारण पहिलाच सांगितले आणि नोकरी मिळाली नाही तर फुकट चर्चा व्हायची ही भीती होतीच. त्यांच्या स्टॉलवरही तरुण भारत असायचा,तोच आधार पकडून हळूच विचारलं की हैदर मामू हे तरुण भारत पेपरचं ऑफिस फार मोठं असेल काय? ते म्हटले तुला काय करायचं घेऊन, मी म्हटलं सहज हो,एवढा मोठा पेपर छापतात रोज ऑफिस नक्कीच मोठं असणार की.... होय रे असेल मोठं, पण तुझा संबंध काय? हैदर मामू असं बोलून माहिती काढून घेण्यात हुशार होते, आणि लहान पणापासून मला चांगलं ओळखत होते. मी म्हटलं, अहो संबंध काय नाही पण एकदा बघून यायचं म्हणतो,कसं आहे ते. हैदर मामू भडकून म्हणाले अबे तुला कशाला आत घेतील ते तरुण भारत वाले? बाहीर दोन मोठे शिपाई असत्यात त्यांच्या दारात आणि हातात बंदुकबी असते. मी चटकन म्हणालो बाहेरच्या बाहेर बघून येतो मग, बस यायला अजून दहा एक मिनिटं होतीच. मी तेवढाच पत्ता काढून घ्यायच्या प्रयत्नात आणि चिरलेला कांदा पिठात कालवत हैदर मामू काय पत्ता सांगेनात. शेवटी मी हळूच म्हणालो राहूदे घ्या काय आजच जायचं नाही, कधीतरी सवडीने सांगा,मग बघून येतो.

त्या काळात मोबाईल असते तर बेळगावच्या कुणालातरी फोन करून चटकन विचारून टाकले असते, गुगल असते तर चटकन पत्ता शोधला असता आणि मॅप लावून किती दूर आहे,कुठे वळायचे हे सगळे एका क्षणात शोधूनही काढले असते. पण हे सगळं पुढे येणार आहे हे सुद्धा मला तेंव्हा माहीत नव्हतं. एवढ्यात महाराष्ट्र बस आली. चंदगड बेळगाव. मी एकदा बस कडे आणि दुसर्यादा हैदर मामुकडे आशेने बघितले. अबे मॅड बस आली बघ, जा, बेळगावलाच जायलास नव्हे? आपल्या शैलीत हैदर मामू बोलले. आणि हे, बस मधनं उतर आणि कुठेबी न वळता समादेवी मंदिर पर्यंत चालत जा, तिथनं डाव्या सायडेस वळ, तिथनं परत चाल, एक पोलीस स्टेशन लागताय, त्याच्या समोर हाय तरुण भारत. आजच बघून ये आणि लक्षात ठेव आत जाऊ नकोस. हैदर मामुची ती सर्व वाक्यं मी मनात साठवून घेतली. आणि मनात म्हटलं दोन शिपाई राहुदेत नाहीतर दहा, मला तर आत जावंच लागेल. पळत पळत बसकडे गेलो.पत्ता मिळाला होता आणि आता तिथं काय विचारतील? काय बोलायचं? कसं बोलायचं?पूर्ण पावडर पुसली का? मी काळा दिसेन की गोरा? अंगाला घामाचा वास येईल काय? असले सगळे विचार डोक्यात भरून घेऊनच मी बसमध्ये शिरलो. आणि तिकीट काढले एक फुल्ल बोगारवेस.

English version

I am not a famous writer.  But by the grace of Tarun bharat  certainly a well-known reporter.  It took many years to develop a style.  But the style that came with writing was also appreciated.  This experience has come from many senior people in terms of work.  Now that blogging has started, the experience is getting bigger.  A number of my colleagues complimented me, the creator of one of the webseries kept calling and praising me, and everyone else added energy by saying, "Hey, Baba, write soon."


 Hearing the appreciation I got in only two or three blog posts has widened my chest as usual.  I was talking to one of my special reader yesterday.  That reader said from my previous blog that Prasad, you have not reached the Turkewadi Phata yet.  I said I didn't know the office of Tarun Bharat where I worked for seventeen years, I was walking and thinking.  Then we laughed a lot using emojis on our WhatsApp chat.  People are eager to know about me.  So this next part is to write a blog.


 So it happened that I had gone to Tarun Bharat to apply for the post of student correspondent, all the preparations were done and my trek to Phata, a kilometer away from our village, had started.  And realized that now that the bus had stopped near St. Xavier's in Belgaum, I would first have to ask someone where the office of Tarun Bharat was.  That thought eased the confusion a bit and I started to take quick steps to get to the phata.  The heat of son was growing, it was too late to make all the preparations and in that hot atmosphere of half past one in the afternoon, my face, which was powdered with ponds, was washing away with sweat.  I used to try to look beautiful with a mustache on my face.  The age was just 18 and in two or three days 18 would be completed and 19 would start.  At that time, at a very young age, it was a hobby to turn one's hair around and look in the mirror to see what kind of hero I look like.  All the Khans were our childhood heroes.  Hrithik, with his short beard and long locks, had come to that new turn , so the childishness of being happy by realizing in  mind that I looked like him that while walking was still going on.  The happy thoughts that came to my mind at that time were that I forgot all about burning sun, rain or walking distance on the road and the distance to be cut.


 That’s why I reached our phata early.  It was two o'clock in the afternoon.  When we came to the fork, we had the support of Haider Mamu.  Haider Sheikh was the guide of that time, who had set up a stall of tea and tasty bhajji for many years.  The Wikipedia and bus schedules of the road from Goa to Belgaum.  Without saying him anything I asked him about address of Tarun bharat.  He used to have Tarun Bharat on his stall too.  He said what do you want to do, I said be easy, they print such a big paper, every day ,the office will be big .... yes, it will be big, but why u wanted all this?  Haider Mamu was clever in extracting information by saying that, and knew me well from a young age.  I said, hey, it's nothing, but I want to see it once, how is it?  Haider Mamu said angrily, "Abe, why would those people take you in?"  Outside, there are two large soldiers with guns in their  hands.  I quickly said I wil look from outside and come, then, the bus was ten minutes away.  I tried once again to get the address but he pertained busy he sliced ​​the chopped onion in the batter. Haider Mamu did not tell me the address.  In the end, I said side by side, it's ok,  don't  want to go today, tell me sometime, I will go  and see.


 In those days, if there was a mobile phone, someone from Belgaum would have called and asked for it.    Just then the Maharashtra bus arrived.  Chandgad Belgaum.  I looked hopefully at the bus once and at Haider Mamu again.  Abe mad bus came, look, go, don't you want to go to Belgaum?  Haider Mamu spoke in his style.  And this, get off the bus and walk to the Samadevi temple without turning anywhere, turn left at the side, walk back from there, there is a police station, Tarun bharat office is exactly in front of it.  Take a look today and remember not to go inside.  I memorized all those sentences of Haider Mamu.  And I said to myself, if not two soldiers, then ten, I have to go inside.  I ran to the bus. I got the address and now what will you ask there?  What to say  How to speak? Was the powder completely removed?  Will I look black or blonde?  Will the body smell of sweat?  With all these thoughts in my head, I got on the bus.  and asked for the ticket, one full bogarwes.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धाकधूक वाढत गेली

 बातम्या वाचणे हा प्रकार माहीत होता पण सलग असे रोज पेपर वाचणे लहानपणी कधी जमले नाही. घरी पेपर घेणं परवडत नव्हतं आणि रविवारी घेतलेला तरुण भारत मुख्य पेपर वाचण्यापेक्षा अक्षरयात्रा पुरवणी वाचण्याबद्दल फार भर होता. सुंदर सुंदर कव्हर स्टोरी आणि आणि ललित लेख वाचायला फार आवडायचे. त्यावेळी अक्षरयात्रेत काही कादंबरी क्र म श स्वरूपात यायच्या,त्या वाचायला मजा यायची. अभ्यासाच्या गोंधळात विशेष वाचन व्हायचं नाही आणि जे काही वेगळं वाचन व्हायचं ते या पुरवणीमुळे त्यामुळे प्रतीक्षा लागून राहिलेली असायची. तसाच बुधवारचा खजाना आणि शुक्रवारी फिल्मी दुनियेवर आधारित पुरवणी हाती पडली की मनसोक्त वाचायची सवय जडली होती. यामुळे बातमी वाचण्याकडचा कल कमी होता. आठवी नववीत गेल्यावर आमच्या जनता विद्यालय हायस्कुलचे मुख्याध्यापक एस एम पाटील सरांनी वर्तमानपत्रात येणारे अग्रलेख वाचण्याचा सल्ला दिला होता. आसपास काय घडतं यावर केलेलं विस्तृत आणि अभ्यासपूर्ण लेखन असतं ते, त्यामुळे वाचा अशी सूचना त्यांनी एकदा वर्गात केली होती. त्यामुळे कधी कधी आणि शक्यतो कमीच अग्रलेख वाचले गेले होते. हे सांगायचा मुद्दा हा की मी बसमध्ये बसू...

अरे परसाद फोन आया है..............

 मागच्या भागात मी म्हणालो, हो तो काळ मोबाईल फोनचा नक्कीच नव्हता. बीएसएनएल चे तरंग नावाचे ओबडधोबड हँडसेट आले होते. त्यावरून कॉल करणाऱ्या आणि घेणाऱ्या अशा दोघांनाही खर्च व्हायचा. म्हणजे पैसे कट व्हायचे. ग्रामीण भागात बीएसएनएल चेच लँडलाईन किंवा हे तरंग हा आधार होता. शहरी भागात स्पाईस कंपनीचे हँडसेट आले होते. रिलायन्स चा दुनिया मुठ्ठीमे म्हणणारा जमाना या क्षेत्रात अजून यायचा होता. आमच्या मामांकडे मोबाईल नव्हता आणि आमच्या घरी तर फोन असण्याचा संबंध अजिबात नव्हता. गल्लीच्या कोपऱ्यावर असलेल्या अबुल भैय्या( म्हणजे तुर्केवाडीचे अबुल शेख. ते सध्या मोठे व्यापारी आहेत)यांच्या दुकानातील फोन हाच आमचा आधार. अबुल भैय्या कायम बाहेर आणि भाभी कायम दुकानात. त्यांच्या दुकानातील साहित्य उधारी घेऊन आम्ही जमेल तेंव्हा पैसे द्यायचो. कधी कुणाला फोन करायचा झाला तरी तीही उधारी सामानाच्या उधारी यादीत समाविष्ट व्हायची. रात्री अपरात्री कधीही फोन आला तरी हाक मारायला हे भैय्या भाभी कधीच त्रास वाटून घ्यायचे नाहीत. त्यादिवशीही तसेच झाले. 2004 चा जानेवारी महिना होता आणि तारीख होती 15. अचानक भाभीचा आवाज आला. अरे परसाद ...